होमपेज › Konkan › सोनाबाईंचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती चुकीची

सोनाबाईंचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती चुकीची

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:46PMसावंतवाडी : प्रतिनिधी

आंबोली - नांगरवाकवाडी येथील श्रीमती सोनाबाई पाटील हिचा मृत्यू मारहाणीने झाल्याची माहिती चुकीची असून पोलीस किंवा ग्रामस्थांनी तिला मारहाण केली नसल्याचा जबाब आंबोली सरपंच लिना लिंगराज राऊत यांनी पोलिसांना दिला आहे. याबाबतचा जबाब तिच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचार्‍यांनी सावंतवाडी पोलिसात अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या समक्ष नोंदविला आहे. 

आंबोली सरपंच सौ. लीना राऊत यांच्याशी याप्रकरणी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, सोनाबाई पाटील यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा आरोप चुकीचा आहे. तिला मारहाण झाल्याची वस्तुस्थिती खरी नाही. ते  चुकीचे आहे. ग्रामपंचायतीला  अतिक्रमण हटवायचे होते यासाठी ग्रामपंचायतीने पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. रस्त्यावर आलेली, पत्रे टाकलेली शेड हटविण्याच्या कामासाठी कर्मचारी पुढे गेले असता सोनाबाई पाटील या त्या ठिकाणी काम अडविण्याकरिता आल्या व त्या पत्रे काढत असताना खाली बसू पाहत होत्या. पोलिसांनी तिच्यासह अन्य एका महिलेला हाताला धरुन समोर आणून बसविले. तसेच यावेळी अतिक्र मण  न हटविल्यास बहुजन  समाज पार्टी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी  आंबोली ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला व त्यांनी ग्रामपंचायतीच्या मुख्य दरवाजाला कुलूपही ठोकले होते, अशीही माहिती सरपंच सौ. राऊत यांनी दिली.

  लीना राऊत म्हणाल्या, हे घर दहा वषार्ंपूर्वी  निर्लेखित  करण्याचा प्रस्ताव  तयार करण्यात आला होता. या कुटुंबीयांना घरकुल योजना मंजूर केली होती. आजही त्याची भरपाई  पाटील कुटुंबीयांच्या नावे शासनदरबारी पडून आहे. मुळात सोनाबाई हिचे तिच्या नावे असलेले घर नव्हते. त्या  आपल्या  मुलीकडे रहायच्या. त्यामुळे अनधिकृत घराचा भाग तोडताना तिचे दागिने चोरीस जाण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या आपापसातील वादातून नाहक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ - प्रशासनाला वेठीस धरले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.