Thu, Aug 22, 2019 08:11होमपेज › Konkan › अन्यथा गोवा- महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको

अन्यथा गोवा- महाराष्ट्र सीमेवर रास्ता रोको

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:44PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी  

गोवा- बांबुळी  रुग्णालयात सिंधुदुर्गातील रुग्णांना आरोग्य सेवा निशुल्क देण्याबाबत महाराष्ट्र व गोवा मुख्यमंत्र्यांनी येत्या पंधरा दिवसात सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा गोवा - महाराष्ट्र सीमेवरील बांदा येथे रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे. 

गोव्याला लागणारी वीज आणि पाणी महाराष्ट्राने दिले, मग आरोग्य सेवेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय का? असा सवाल  श्री तळवणेकर यांनी केला आहे. ते सावंतवाडी  पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

तळवणेकर म्हणाले, गोवा शासकीय महाविद्यालयाला परवानगी देताना तत्कालीन परिस्थितीत लोकसंख्या कमी पडत होती. त्यावेळी अखंड रत्नागिरी- सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात घेवून त्या महाविद्यालयाला परवानगी केंद्र शासनाकडुन तत्कालिन माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी घेतली होती. मात्र आजचे गोव्याचे मंत्री हा इतिहास विसरले आहेत. श्री तळवणेकर पुढे म्हणाले, सिधुदुंर्ग जिल्ह्याकडुन गोव्याला तिलारीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. महाराष्ट्राकडून वीज दिली जाते, असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला आरोग्य सेवेसाठी पैसे मोजणे चुकीचे आहे. 1 जानेवारी  सुरू करण्यात आलेल्या शुल्काच्या यादीत दिवसाला पन्नास रुपये बेड चार्ज आकारण्यात आला आहे. इतिहासात देशातील पहिल्याच रुग्णालयात अशा प्रकारे शुल्क आकारण्यात आले आ.े हा सर्व प्रकार चुकीचा आहे. याबाबत योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे, तशी मागणी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. तसेच येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा बांदा येथे रास्तारोको करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. तळवणेकर यांनी  दिला. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील आंदोलन ठरणार

यावेळी तळवणेकर म्हणाले उद्या चार तारखेला ओरोस येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस येणार आहेत. आम्ही जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन दोन्ही राज्याकडून सकारात्मक भूमिका अपेक्षित आहे. अन्यथा आंदोलनांचा निश्तितपणे करणाऱ असल्याचा इशारा त्यांनी  दिला