Thu, Jan 17, 2019 12:26होमपेज › Konkan › ‘चांदा ते बांदा’तून जिल्ह्यासाठी शंभर कोटी

‘चांदा ते बांदा’तून जिल्ह्यासाठी शंभर कोटी

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 10:47PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

सिंधुदुर्ग व गडचिरोली हे पर्यावरणाचे रक्षण करणारे जिल्हे आहेत. मात्र, ज्यांनी पर्यावरणाचे शोषण केले ते पुढे गेलेत आणि हे दोन्ही जिल्हे विकासात मागे राहिलेत. यापुढे सिंधुदुर्गच्या विकासात कोणताच अडसर येणार नाही. ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.

सावंतवाडी येथे राजवाड्यात भाजपतर्फे आयोजित सावंतवाडी विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सरचिटणीस राजन तेली, अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष महेश सारंग, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, राजन म्हापसेकर, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.

ना. मुनगंटीवार म्हणाले, गेली 15 वर्षे सत्तेत असलेले आता पुतणा मावशीचे प्रेम दाखवत आहेत. संविधान बचाव मोर्चे काढत आहेत. ही ढोंगी माणसे आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन यांचा ढोंगीपणा समोर आणावा. भाजप सत्तेसाठी व निवडणुकांसाठी राजकारण करीत नाही. भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपने सर्वसामान्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.