Mon, Mar 18, 2019 19:25होमपेज › Konkan › मोर्ले-पारगड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा वन विभागास घेराव

मोर्ले-पारगड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा वन विभागास घेराव

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 10:34PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

मोर्ले-पारगड रस्ता न होण्यास येथील वन विभाग जबाबदार आहे. पालकमंत्री व उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी रस्त्याबाबत दिलेले आश्‍वासन पाळले नाही. दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत मोर्ले ग्रामस्थांनी बुधवारी वन विभागास घेराव घातला.
मोर्ले-पारगड रस्ता कामावरून मोर्ले ग्रामस्थांनी बुधवारी वन विभागास स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला. या रस्त्यासाठी आजपर्यंत तीन उपोषणे झाली. कागदोपत्री लिहून आश्‍वासने भरपूर दिली गेली; परंतु पदरात काहीच पडले नाही. रस्त्याचे काम या दोन दिवसांत सुरू न झाल्यास 18  डिसेंबरला सावंतवाडी वनाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा मोर्लेवासीयांनी दिला.

 मोर्ले-पारगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. दोडामार्ग आणि चंदगड रस्ता झाला तर पन्नास खेड्यांचा विकास होणार आहे. मोर्ले-पारगड  रस्त्याचे भूमिपूजन झाले आणि रस्त्याचे काम थोड्या दिवसांत पूर्ण होईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दीपक केसरकर व उपवनसंरक्षक  समाधान चव्हाण यांनी दिले होते. या रस्त्यासाठी मोर्लेवासीयांनी उपोषण केले होते. त्यात समाधान चव्हाण यांनी एका महिन्यात झाडी काढली जाईल, असे सांगितले होते. तर बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू करणार, असे आश्‍वासन दिले होते. ‘अन्यथा आत्मदहन करू’