Tue, Jan 22, 2019 07:32होमपेज › Konkan › घारपी-उडेलीतील भूमिहिनांच्या जमिनी पुन्हा शासनाकडे 

घारपी-उडेलीतील भूमिहिनांच्या जमिनी पुन्हा शासनाकडे 

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:39PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

चुकीच्या खरेदीखतांद्वारे काही केरळीयनांना विकण्यात आलेल्या घारपी-उडेली येथील भूमिहिनांच्या सुमारे 600 एकर जमिनी शासनाने  पुन्हा ताब्यात घेतल्या आहेत. केरळीयनांना विक्री केल्याने भूमिहिनांना या जमिनीवर पाणी सोडावे लागले असून आता या जमिनींच्या सात-बारा दफ्तरी ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्यात आली आहे. 

2009 साली वर्ग 2 च्या या जमिनींची खरेदीखते करून शासन नियम ज्या अधिकार्‍यांनी डावलले त्यांच्यावर मात्र कोणतीही करवाई  न करता अभय दिल्याची चर्चा आहे. सिलिंग कायद्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील बर्‍याच अतिरिक्‍त जमिनी भूमिहिनांना दिल्या होत्या.घारपी-उडेली येथील शेकडो हेक्टर जमिनीही भूमिहिनांना देण्यात आल्या होत्या. भूमिहिनांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कसण्यासाठी या जमिनी देण्यात आल्या असल्या तरीही या जमिनीवर वर्ग 2 अशी नोंद करून शासनाने या जमिनीवर आपला ताबा ठेवला होता. त्यामुळे नियमानुसार या जमिनींची विक्री करण्यास 
भूमिहिनांना प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र, असे असतानाही काही केरळीयनांनी काही स्थानिक, दलाल, काही अधिकारी यांना हाताशी धरून 600 एकरांवर शासकीय जमिनी नियम डावलून खरेदी केल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, दै.‘पुढारी’ने हे प्रकरण उजेडात आणल्यावर कोकण आयुक्‍तांनी याची दखल घेतली.