Mon, Nov 19, 2018 21:00होमपेज › Konkan › पाळकोयत्याने हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

पाळकोयत्याने हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:33PMसावंतवाडी :  

कलंबिस्त - रायचीवाडी येथील संजय वसंत सावंत यांना पाळकोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित नितीन गणपत राजगे (वय 42) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कलंबिस्त - रायचीवाडी येथील फिर्यादी संजय वसंत सावंत हे कुटुंबासह राहत असून ते शेतावर गेलेले असताना  12 वा. च्या सुमारास त्यांच्याच वाडीत राहणारे संशयित नितीन राजगे याने दारू पिऊन फिर्यादी यांच्या आई- वडिलांना विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यास गेलेल्या सावंत यांच्याशी वाद उकरून काढत संशयित राजगे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या उद्भवलेल्या वादात हातातील पाळकोयता संजय सावंत यांच्या डोक्याला डाव्या बाजूस मारून गंभीर दुखापत केली. यावेळी रक्‍तबंबाळ अवस्थेत फिर्यादी यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सावंतवाडी येथील पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस प्रवीण माने करीत आहेत.