Wed, Jan 23, 2019 05:22होमपेज › Konkan › राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाला सावंतवाडीत संमिश्र प्रतिसाद 

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाला सावंतवाडीत संमिश्र प्रतिसाद 

Published On: Aug 08 2018 10:32PM | Last Updated: Aug 08 2018 10:02PMसावंतवाडी : वार्ताहर

 सातवा वेतन आयोग व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम दुसर्‍या दिवशी दिसून आला. या संपामुळे शासकीय यंत्रणाच ठप्प झाली. कामकाज बंद असल्याने सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. या संपाला सावंतवाडी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.काही अधिकार्‍यांनी कार्यालयामध्ये उपस्थिती लावली परंतु कामावर बहिष्कार टाकला. कार्यालयीन कामकाज बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून सरकारी कामानिमित्त येणार्‍या अनेक लोकांच्या कामांचा खोळंबा झाल्याने त्यांना माघारी परतावे लागले.

सर्व शिक्षक संपामध्ये सहभागी झाल्याने प्राथमिक, माध्यमिक शाळा बंद होत्या. कंत्राटी शिक्षकांमुळे काही शाळा सुरू होत्या. या संपामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वन विभाग, पंचायत समिती, तहसील व प्रांत ऑफिसमधील राजपत्रित अधिकारी वगळता सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. 

सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी संपात सहभाग न घेता काळ्या फिती लावून काम केले. या संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.