होमपेज › Konkan › निगुडेत ५५ लाखांचा अवैध गुटखा जप्त

निगुडेत ५५ लाखांचा अवैध गुटखा जप्त

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 10:14PMसावंतवाडी : प्रतिनिधी

इन्सुली - डोबवाडी येथे सिंधुदुर्ग पोलिसांनी केलेल्या पहिल्या अवैध गुटखा साठा जप्‍तीच्या कारवाईनंतर याच भागातील निगुडे येथे रविवार दुसरी कारवाई केली.यात 55 लाखांचा अवैध गुटखा साठा  स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केला. पोलिस उपअधीक्षक  दयानंद गवस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

 बांदा परिसरात इन्सुली  आणि निगुडे येथे एलसीबी विभागाने दोन मोठ्या कारवाया करीत सुमारे 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिसांचे कौतुक होत आहे. अशा प्रकारे गुटखा विक्री करणार्‍यांवर  तडीपारची कारवाई करण्याचा दशारा जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी  दिला आहे.याप्रकरणी आबा श्रीकृष्ण शिरसाट (50, रा. इन्सुली - डोबाशेळ) याच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे.  हा  अवैध गुटखा साठवणुकीसाठी निगुडे - मधलीवाडी येथील एका घराच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यांमध्ये गोडावून करुन साठवून ठेवण्यात आला होता.