Sun, Nov 18, 2018 19:44होमपेज › Konkan › दोडामार्ग नगराध्यक्षांसह ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

दोडामार्ग नगराध्यक्षांसह ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:26PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

कसई-दोडामार्ग येथील केळीचे टेंब, म्हावळकरवाडी, धाटवाडी डावा कालवा रस्ता कामाबाबत 31 मार्चपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी तिलारी पाटबंधारे कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात दोडामार्ग नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्षा सौ. साक्षी कोरगावकर, नगरसेविका विनया म्हावळणकर, सुनील म्हावळणकर, विनायक म्हावळणकर, मदन कुंडेकर, अभिनाथ देसाई, संदीप कोरगावकर आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

कसई-दोडामार्ग तिलारी प्रकल्प डावा तीर कालवा अंतर्गत असलेला 4.26 कि.मी. लांबीचा रस्ता हा केळीचे टेंब, म्हावळंकरवाडी, कसई-दोडामार्ग, कसई-गावठण, धाटवाडी या भागातून जातो. या कालव्याच्या सेवा पथकावरून नागरिक, तसेच शालेय विद्यार्थी ये-जा करतात. पावसाळ्यात हा रस्ता अतिशय दलदलीचा बनत असल्याने बाजारपेठ व अन्य परिसराशी या भागाचा संपर्क तुटतो.