Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘थेट सरपंच निवड’ निर्णय यशस्वी : ना. पंकजा मुंडे

‘थेट सरपंच निवड’ निर्णय यशस्वी : ना. पंकजा मुंडे

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:40PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

थेट सरपंच निवड हा या सरकारने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयांमुळे सर्व ग्रामपंचायतींना शिक्षित सरपंच मिळाले आहेत. या सरपंचांवर गावांचा विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचयतीना मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या. पालकमंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी उपस्थित होते.

ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच न निवडता थेट जनतेतून सरपंच निवडीचा घेतलेला या युती सरकारचा निर्णय चांगला ठरला आहे. या निर्णयांमुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला सुशिक्षित सरपंच मिळाला आहे. या सुशिक्षित सरपंचांच्या माध्यमातून गावांचा विकास केला जाणार आहे. काही ठिकाणी पक्षाचे तर काठी ठिकाणी गाव विकास पॅनलचे सरपंच आहेत. या सरपंचाना गावचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता लागणार आहे. हा निधी ग्रामपंचायतींना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती ना. पंकजा मुंडे यांनी दिली.  ग्रामीण भागातील अनधिकृत घरे नियमित करण्याचा एक धाडसी निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण भागातील 2011 नंतरच्या घरांना रेडी रेकनरचा जो दर असेल तो भरून घेवून तर त्यापूर्वीच्या घरांना विनामोबदला नियमित केले जाणार आहे. शिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना स्वतःची घरे दिली जाणार असल्याचेही  ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले.