Fri, May 24, 2019 09:12होमपेज › Konkan › 'भारीप'चा संभाजी भिडेंच्या उपस्थितीला विरोध

'भारीप'चा संभाजी भिडेंच्या उपस्थितीला विरोध

Published On: Feb 10 2018 11:31PM | Last Updated: Feb 10 2018 11:31PMदेवरुख : वार्ताहरसंगमेश्‍वर तालुक्यातील कनकाडी येथे 11 ते 13 फेब्रुवारी रोजी वाडेश्‍वर मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला संभाजी भिडे यांना निमंत्रित केल्याने एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे कोरेगाव भिमा येथे दंगल घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या संभाजी भिडे यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्याने भारीप बहुजन महासंघाने मज्जाव केला आहे. भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शांताराम कदम यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे. तसेच संभाजी ब्रिगेड या संघटनेनेदेखील जाहीर निषेध केला आहे.