Wed, Feb 20, 2019 02:31होमपेज › Konkan › साकेडीत रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळला

साकेडीत रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळला

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:42PM

बुकमार्क करा
कणकवली : वार्ताहर

साकेडी येथील रेल्वे फाटकाजवळ अज्ञात तरूणाचा मृतदेह गुरूवारी दुपारी आढळुन आला. रेल्वे ट्रॅकनजीक काम करणार्‍या कामगारांना दुपारी 3 वा. च्या सुमारास हा मृतदेह दिसून आला. याची माहिती त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आली. त्यानंतर  कणकवली पोलिस घटनास्थळी पोहचले. तो मृतदेह 35 ते 40 वर्षे वयोगटातील तरूणाचा असून अंगावर पिवळे टिशर्ट व निळसर जिन्स परिधान केलेली आहे. त्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.