Sat, Sep 22, 2018 23:14होमपेज › Konkan › रत्नागिरी: बंद घराचा कडीकोयंडा फोडून २५ तोळे सोने लंपास

रत्नागिरी: बंद घराचा कडीकोयंडा फोडून २५ तोळे सोने लंपास

Published On: Aug 31 2018 9:52PM | Last Updated: Aug 31 2018 9:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

कारवांचीवाडी आदिशक्ती नगरातील बंद घराचा कडीकोयंडा उचकडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाच्या रोख रक्कमेसह सुमारे २५ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेच्या रिफायनरी आंदोलनामुळे पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा उठवित चोरट्यांनी भर दुपारी हा माल लंपास केला. रत्नागिरी शहरात चोरट्यांनी आपले लक्ष ग्रमीण भागाकडे वळविले आहे. भर दुपारी झालेल्या चोरीमुळे पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आदिशक्तीनगर येथे राहणारे अरूण शामराव गुजर हे आपल्या नियमित कामासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. घरातील इतर नातेवाईक कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत घराची कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेले कपाड फोडून यातील एक लाख रू.ची रोख रक्कम तसेच २५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. 

गुजर हे सायंकाळच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडीकोयंडा तुटलेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम करीत आहेत.