Tue, May 26, 2020 23:37होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली

Published On: Jul 11 2019 9:55PM | Last Updated: Jul 11 2019 9:55PM
खेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवार दि ११ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पोलादपूरच्या हद्दीमध्ये धामणदेवी गावानजीक दगड व मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आले असले तरी मोठ्या प्रमाणात पुन्हा दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

रात्री उशिरा पर्यंत कशेडी टॅप वरील वाहतूक पोलिस व पोलादपूर येथील पोलिस प्रशासनातील अधिकारी व ग्रामस्थ दरड कोसळलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.