Tue, Jul 23, 2019 18:58होमपेज › Konkan › बड्या थकबाकीदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा!

बड्या थकबाकीदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा!

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 10:00PMमालवण : वार्ताहर 

बँकाच्या बड्या थकबाकीदरांची नावे जाहीर करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, ग्राहक खात्यावरील दंड आकारणी बंद करा, ठेवीतील व्याजदर वाढवून व्याजकर मुक्‍त करा, यासह  अनेक मागण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाईज युनियनच्या सिंधुदुर्ग विभागाने मालवणात ग्राहकांच्या सह्यांची मोहीम राबवली.

या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, प्रमोद ओरोसकर, शांती पटेल, मीना घुर्ये, गणेश प्रभुलीकर, कृष्णा ताम्हणकर, संतोष रानडे, राजरूप केळूसकर आदी उपस्थित होते.

देशभरातील बँकिंग व्यावसायत वाढत जाणारी थकबाकी व आर्थिक घोटाळ्यांचे आकडे सामान्य ठेवीदारांच्या बचतीशी थेट निगडित आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणूक करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.सर्वसामान्याना बचतीचे संरक्षण झाले पाहिजे, बचतीवर योग्य व्याजदर ठेवण्यात यावा अशा प्रमुख मागण्या असल्याचे रानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

वाढत्या थकबाकीमुळे बँकाचा नफा कमी होऊ लागल्याने बँकानी ठेवीवरील  व्याजदर कमी केले. खात्यात कमी रक्‍कम रहिल्यास दंड आकारुन ठेवीदारांच्या बचतीवर हल्ला चढविला आहे. महागाई वाढत असताना बचतीवरील व्याजदर कमी करणे सर्वसामान्याना परवडणारे नाही. या विरोधात संघटनेचा लोकासाठी लढा सुरु आहे. शासनाचे धोरण चुकीचे आहे. ग्राहकांना त्रासदायक असल्याचे सांगत सह्या करुन शासनाकडे निवेदनाद्वारे ग्राहकांच्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न असल्याचे रानडे यांनी म्हटले आहे