Wed, Nov 14, 2018 10:06होमपेज › Konkan › स्वातंत्र्यदिनी आज जिल्ह्यात ५३ आंदोलने

स्वातंत्र्यदिनी आज जिल्ह्यात ५३ आंदोलने

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात 53 आंदोलनाद्वारे सर्वसामान्यांचा एल्गार उमटणार आहे. त्यांपैकी 28 आंदोलने ही जिल्हास्तरावर तर 35 आंदोलने तालुकास्तरावर विविध ठिकाणी करण्यात येणार आहेत. जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. तर  ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दोनवेळा रत्नागिरी बंद आंदोलन  झाले. त्याचबरोबर शासकीय कर्मचार्‍याचा तीन दिवसांच्या संपाने जिल्ह्यात प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. संपूर्ण ऑगस्ट महिना आंदोलनाने व्यापला असताना आता 15 ऑगस्टला जिल्ह्यात  53 आंदोलने करण्यात येणार आहेत. यामध्ये 24 उपोषणे, 21 निदर्शने, 8 धरणे आंदोलने करण्यात येणार आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या एस.टी. भाडेवाढीच्या निषेधार्थ प्रवासी वाहतूक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. वेतनापसून वंचित रहिल्याने सेवानिवृत्त शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा परिषद येथे उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर अशी 28 आंदलने होणार 
आहेत. 

तर चिपळूण तालुक्यात कान्हे ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ अन्यायाच्या निषेधार्थ पंचायत समितीस्तरावर उपोषण करणार आहेत. खेड तालुक्यातील अलुसरे येथील बौद्धवाडीतील ग्रामस्थ वहिवाट रोखल्याने तालुकास्तरावर उपोषणाला बसणार आहेत. तालुकास्तरावर अशी 35 आंदोलने पंचायत समिती आणि तहसीलस्तरावर करण्यात येणार आहेत.