Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Konkan › ‘बांधकाम’चा ३ कोटींचा आराखडा रद्दची नामुष्की

‘बांधकाम’चा ३ कोटींचा आराखडा रद्दची नामुष्की

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:43PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

जिल्हा परिषद बांधकाम समितीने रस्ता डांबरीकरणाच्या (ब, क गट) कामांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह राष्ट्रवादी सदस्यांच्या गटातील कामांना प्राधान्य दिले गेले. त्याचवेळी बांधकाम समितीतील सत्ताधारी सेना सदस्यांवच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले. या असमतोल न्यायामुळे बांधकाम समितीच्या सत्ताधारी सेना सदस्यांनी बुधवारच्या सभेवर बहिष्कार अस्त्र उपसले. बांधकाम समिती सभापती अरुण कदम यांनी आराखड्यात सुधारणा करण्याचे मान्य केल्यानंतर बांधकाम समितीची सभा झाली. या सभेने जुना आराखडा रद्द करून सुधारित आराखडा बनविण्याचा ठराव मंजूर केला.

कामांचा आराखडा बनविण्याचे पूर्ण अधिकार संबंधित समिती सभापतींचे असतात. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीचे भान ठेवून बांधकाम सभापती कदम यांनी खेड, दापोली तालुक्यांना प्राधान्य दिले होते. त्यानुसार 3 कोटी 20 लाख रुपयांचा ‘ब’, ‘क’ गटाचा (रस्ता डांबरीकरण) आराखडा बनवून शासन मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यात जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या मतदारसंघाला 1 कोटी 10 लाख, उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्या मतदारसंघातील 40 लाख रुपयांची कामे घेण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या एका महिला सदस्याच्या गटातील कामे होती. मात्र, बांधकाम समितीतील सेनेच्या 7 पैकी एका सदस्याच्या मतदारसंघाला 10 लाख रूपये देण्यात आले आहेत.

रस्ता डांबरीकरणाच्या कामात बांधकाम समितीमधीलच आणि सत्ताधारी सेना सदस्यांनाच डावलले गेल्याची माहिती राजापुरातील शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांना मिळाली. त्यांच्या सौभाग्यवती भारती सरवणकर बांधकाम समिती सदस्य आहेत. सरवणकर यांनी शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आलेला संपूर्ण आराखडा मंत्रालयातून मिळवला. त्यातील कामांची वाटणी पाहून समिती सदस्यांवरच अन्याय झाल्याची त्यांना खात्री पटली. त्यानंतर बांधकाम समितीतील सेना सदस्यांची मोट बांधली जाऊ लागली. आराखड्याचा पुरावा हाती लागल्यानंतर सभापतींना काहीही सांगून वेळ मारून नेण्याची संधी राहिली नाही.

बुधवारी बांधकाम समितीची सभा लागली. सभेची वेळ झाली तरी सदस्य मंडळी आली नव्हती. गाजावाजा नको म्हणून सेनेच्या समिती सदस्यांनी सेनेचेच बांधकाम सभापती अण्णा कदम यांना विश्रामगृहावर बोलावून घेतले. येथे गुप्त बैठक झाली. आमच्या मतदारसंघासाठी दुजाभाव का? असा सवाल करण्यात आला. अखेर सभापतींनी सहकारी सदस्यांना अपेक्षित असलेले आश्‍वासन दिले. त्यानंतर जि.प. बांधकाम सभापतींच्या दालनात सभा झाली. सदस्यांनी जुना आराखडा रद्द करून सुधारित आराखडा बनविण्याचा ठराव केला.