रत्नागिरी (प्रतिनिधी) :
शहरातील सन्मित्रनगर येथे अज्ञात कारणावरून तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 1 वा. सुमारास घडली. सुमित दीपक शेळके (वय 30) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत चेतन विठ्ठल शेळके (39, रा. चर्मालय, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी चेतन शेळके हे काही कामानिमित्त सन्मित्रनगर येथे सुमितच्या घरी गेले असता त्यांना सुमित गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. चेतनने आरडाओरडा करताच शेजारी राहणारे वैभव माने यांनी सुमितच्या घरी धाव घेतली. त्यानंतर या दोघांनी मिळून त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.