Wed, Sep 19, 2018 13:01होमपेज › Konkan › दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू 

दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू 

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 10:53PMरत्नागिरी : प्रतिनिधी

दुचाकीसमोर अचानक बैल येऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मुुकेश लक्ष्मण राठोड (35, रा. सुयोग सोसायटी उत्कर्षनगर, कुवारबांव, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. 

मुकेश बुधवारी मोटारसायकल (एमएच 05 वाय 3875) घेऊन रत्नागिरी येथून उत्कर्षनगर कुवारबांव येथे निघाला होता. तो कुवारबांव येथील हॉटेल समता समोर आला असता मोकाट जनावरे धावत रस्त्यावर आली. त्यांमधील एक बैल त्याच्या गाडीसमोर अचानक आल्याने अपघात झाला. त्यामध्ये मुकेश हा गाडीवरून फेकला गेला.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.