Mon, Feb 18, 2019 20:47होमपेज › Konkan › पत्नीनेच केला पतीच्या डोक्यात कोयत्याने वार

पत्नीनेच केला पतीच्या डोक्यात कोयत्याने वार

Published On: Aug 08 2018 10:32PM | Last Updated: Aug 08 2018 10:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

घरगुती वादातून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याप्रकरणी पत्नीविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8.15 वा. सुमारास घडली.

देवयानी दीपक मोवेकर (रा. तेरसे-कोंडेवाडी, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. बुधवारी सकाळी दीपक मोवेकर मुलाला शाळेत जाण्यासाठी झापेतून उठवत होते. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की, बाहेरची कामे आणि घरातील कामेही मीच करायची काय? दीपकच्या या बोलण्याचा राग आल्याने पती-पत्नीत वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने देवयानीने रागाच्या भरात पती दीपकच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.