Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Konkan › जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:44PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेले अनेक दिवस पावसाने पाठ फिरवली असताना शनिवारी पाऊस पुन्हा सक्रिय झाला  आहे. गेले अनेक दिवस केवळ एक अंकी पर्जन्यमानाची नोंद झाली असताना शनिवारी पावसाने जोर धरला. शनिवारी पावसाने जिल्ह्यात 17 मि.मी.च्या सरासरीने बर्‍याच दिवसांनंतर एकूण दीडशे मि.मी.ची मजल मारली. गेल्या रविवारी मुसळधार पाऊस झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती याही रविवारी (दि. 17) होताना अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला असून, यंत्रणांना सतर्क राहण्यास कळविण्यात आले आहे.

शनिवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत पावसाने  सरींचा राबता ठेवला होता. मंडणगड 23, दापोली, 25, गुहागर 26, रत्नागिरी 24, खेड मध्ये 18, राजापुरात 14, चिपळुणात 10 आणि संगमेश्‍वर तालुक्यात 9 मि. मी. पाऊस झाला. लांजा तालुक्यात केवळ 4 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

आतापर्यंत जिल्ह्यात 433.28 मि. मी. च्या सरासरीने 3899 मि. मी. एकूण पाऊस झाला.  शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने  गुहागर आणि संगमेश्‍वर तालुक्यांत प्रत्येक एका घराच्या पडझडीत सुमारे 25 हजारांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाने दैनंदिन अहवालाद्वारे कळविली आहे.