Sat, Feb 23, 2019 03:57होमपेज › Konkan › भोंदू पाटील बुवाच्या ३ साथीदारांना जामीन

भोंदू पाटील बुवाच्या ३ साथीदारांना जामीन

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 10:52PM

बुकमार्क करा

रत्नागिरी ः प्रतिनिधी

महिलेला अश्‍लील शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू पाटील बुवाच्या तीन  साथीदारांची न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत प्रभाकर पारकर (वय 47, रा. उंडी, ता. जि. रत्नागिरी), अनिल मारुती मयेकर (रा.काळबादेवी, रत्नागिरी) आणि संदेश धोंडू पेडणेकर (रा. काळबादेवी, रत्नागिरी)  अशी जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पाटील बुवाने नागरिकांना आपण दैवी अवतार असून माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी चमत्कार करू शकतो, मेलेेले मूल जिवंत करतो,  असे सांगून लोेकांना भीती दाखवून त्यांची आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच त्याच्या मठात येणार्‍या महिलेला बुवाने अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप  आहे.