होमपेज › Konkan › तिसर्‍या दिवशी १०२ जण अपात्र

तिसर्‍या दिवशी १०२ जण अपात्र

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रियेत तिसर्‍या  दिवशी बुधवारी 1,325 उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहिले. या भरती प्रक्रियेमध्ये छाती व उंचीच्या निकषात एकूण 102 उमेदवार अपात्र ठरले असून 1,223 उमेदवारांनी मैदानी चाचणी पूर्ण केली.

पहिल्या दिवसाच्या मानाने दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी उमेदवारांकडून या भरती प्रक्रियेत चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या दिवशी सोमवार दि. 12 मार्च रोजी मैदानी चाचणीसाठी 801 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 51 उमेदवार उंची आणि छाती यामध्ये अपात्र झाले असून, एकूण 750 उमेदवारांनी पहिल्या दिवशी मैदानी चाचणी दिली.

भरती प्रक्रियेत दुसर्‍या दिवशी मंगळवार 13 मार्च रोजी मैदानी चाचणीसाठी 1,398 उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहिले. या भरती प्रक्रियेमध्ये छाती व उंचीमध्ये एकूण 94 उमेदवार अपात्र ठरले असून, 1,304 उमेदवारांनी मैदानी चाचणी  यशस्वीपणे पूर्ण केली. दरम्यान, गुरुवार दि. 15 मार्च रोजी 2 हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे.