Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Konkan › चोरट्यांची टोळी गजाआड

चोरट्यांची टोळी गजाआड

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:42PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शाळा-महाविद्यालये फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारी टोळी शहर पोलिसांनी गजाआड केली आहे. यामुळे ‘आयटीआय’सह  शहरातील नाईक हायस्कूलमधील चोरी उघडकीस आली आहे. 
शहरात ‘आयटीआय’सह नाईक हायस्कूलमध्ये चोरी झाली होती.‘आयटीआय’मधून सुमारे 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला होता. 

रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली होती. ‘आयटीआय’ चोरीप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांच्या डी. बी. शाखेने चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यापैकी तिघे हिस्ट्रीशीटर असून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्यांमध्ये ऊजैफ तन्वीर वस्ता (19 रा. आदमपूर राजिवडा), अकिब जिकरिया वस्ता (22 राजिवडा मच्छीमार्केट), अदनान इरफान वस्ता 19 कर्ला), मकबुल सालाउद्दीन दाउद (19 रा.राजिवडा बांध मोहल्ला) आदींचा समावेश आहे.

आयटीआय येथील चोरी उघडकीस आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात एम. एस. नाईक हायस्कूल मधील घरफोडी दाखल करण्यात आली. येथून चोरट्यांनी 61 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबवला होता. त्यामध्ये दोन प्रोजेक्टर, एक बुलेट कॅमेरा व एक युपीएस असा ऐवज आहे. 

पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयितांनी शहरातील एम.एस. नाईक हायस्कूलमधील चोरीची कबुली दिली आहे. नाईक हायस्कूल चोरीप्रकरणी सचिव अश्फाक मुश्ताक नाईक यांनी तक्रार दिली आहे. या चौघांच्या अटकेमुळे शहरातील अन्य चोर्‍याही उघडकीस येण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे.