Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘त्या’ शिक्षक-शिक्षिकेचा मृत्यू

‘त्या’ शिक्षक-शिक्षिकेचा मृत्यू

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील गणपतीपुळे येथील गोकुळ लॉजमध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शिक्षक-शिक्षिकेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात रविवारी  मृत्यू झाला.

नीलेश मधुकर तरवडे (वय 34, मूळ रा. ता. राहुरी, जि. अहमदनगर) आणि गीता गोविंद केंद्रे (30, रा. शिवाजीनगर, ता. खेड, जि. पुणे)अशी उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षक-शिक्षिकेची नावे आहेत. या दोघांनी प्रेमप्रकरणातून हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील एकाच शाळेत शिक्षक म्हणून काम करणार्‍या दोघांनी  शुक्रवारी गणपतीपुळे येथील गोकुळ लॉजवर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघेही विवाहित असून, गेली चार वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते.  शुक्रवारी दुपारी बारा वाजता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. 

दरम्यान, पुणे पोलिस ठाण्यामध्ये ते दोघे बेपत्ता असल्याची नोंद 1 जुलैला करण्यात आली होती. ते दोघेही रत्नागिरीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्याही नातेवाईकांनी रत्नागिरीत धाव घेत त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केेले होते. येथे उपचारांदरम्यान रविवारी दोघांचाही मृत्यू झाला.