Sun, Apr 21, 2019 02:21होमपेज › Konkan › सतरा वर्षे फरारी आरोपीच्या कुडाळात मुसक्या आवळल्या

सतरा वर्षे फरारी आरोपीच्या कुडाळात मुसक्या आवळल्या

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 9:48PMरत्नागिरी : प्रतिनिधी

लांजा येथील चोरीच्या प्रकरणात तब्बल 17 वर्षे फरारी असलेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. कुडाळ येथे त्याला अटक करण्यात आली. 

लांजा पोलिस ठाण्यात सन 2000 साली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित महेश दत्तात्रय मालणकर ऊर्फ मसुरकर (वय 48) याच्याविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा कसून शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

 पोलिस अधीक्षक  प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यांना रेकॉर्डवरील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे या पथकाने रेकॉर्डवरील महेश मसुरकर याच्या वास्तव्याबाबत माहिती घेण्यात आली. त्यावेळी हा संशयित कुडाळ तालुक्यातील भरणी येथे आला असल्याची माहिती मिळाली. 

या  आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक दि.22 रोजी कुडाळ येथे रवाना झाले होते. महेशला त्याच्या घरातून  ताब्यात घेऊन अटक केली व पुढील कार्यवाहीकरिता लांजा पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले.  शोधपथकात हावलदार संदीप कोळंबेकर, मिलींद कदम, सत्यजित दरेकर, अमोल भोसले, दत्ता कांबळे यांचा समावेश होता.