Tue, Feb 19, 2019 22:43होमपेज › Konkan › रिक्षा- मॅक्झिमोच्या अपघातातील एक जण गंभीर

रिक्षा- मॅक्झिमोच्या अपघातातील एक जण गंभीर

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 11:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

गुरुवारी दुपारी साडवली येथे रिक्षा आणि मॅक्झिमोच्या अपघातातील तीन गंभीर रुग्णांपैकी एकाला कोल्हापूर येथे, तर अन्य एकाला रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवीण जयपाल देसाई (रा. हातकणंगले, कोल्हापूर) याला कोल्हापूर येथे, तर वसंत धोंडू कळंबटेला रत्नागिरीतीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सुभाष तानाजी मेस्त्री यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात रिक्षाचालक राजेंद्र वेल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातास कारणीभूत मॅक्झिमोचालक मयुरेश सरफरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.