Sun, Mar 24, 2019 12:39होमपेज › Konkan › ‘रत्नदुर्ग’ आगीत होरपळला

‘रत्नदुर्ग’ आगीत होरपळला

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 9:27PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

शहराच्या पश्‍चिमेकडील ‘रत्नदुर्ग’ किल्ल्यावर गेल्या आठवड्यात अनेकवेळा लागलेल्या आगीत मोकळ्या जागेतील सुकलेले गवत जळून गेल्याने किल्ल्यातील निम्मा परिसर काळा ठिक्‍कर पडला आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरी वेळोवेळी लागलेली ही आग नागरिकांनी अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली.

‘रत्नदुर्ग’ किल्ल्याचा परिसर 120 एकरांचा आहे. त्यातील निम्म्या जागेत लोकवस्ती असून उर्वरित जागा मोकळी आहे. या मोकळ्या जागेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत उगवते. पाऊस थांबला की काही दिवसांतच हे गवत सुकून जाते. काहीवेळा उन्हामुळे तर काहीवेळा समाजकंटक मुद्दामहून या गवताला आग लावतात. काही वेळातच ही आग भडकते. डोंगराचा भाग असल्याने तेथे अग्‍निशमन बंब पोहोचू शकत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनाच ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

गत आठवड्यात अनेकवेळा आग लागण्याचे प्रकार घडले आहे. यात किल्ल्यातील निम्म्या परिसरातील गवत जळून गेले आहे. ही आग जवळच्या आंबा बागांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी नियंत्रणात आणली. दुपारी आणि रात्री असणार्‍या एकांतात येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून त्यांच्या गैरकृत्यांना आळा घालावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.