Sat, Nov 17, 2018 16:52होमपेज › Konkan › ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव!

‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव!

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 9:50PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

गेली 79 वर्षे इतिहासाचा साक्षीदारच नव्हे तर भागीदार असलेल्या  ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी सोमवारी रत्नागिरी कार्यालयात मान्यवर, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते, हितचिंतकांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून दै.  ‘पुढारी’च्या अखंडित प्रवासाबद्दल आणि विश्‍वासाने जनमानसात निर्माण केलेला दबदबा व विश्‍वासार्हतेचा आवर्जून उल्लेख करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कोकणी माणसाच्या प्रश्‍नांसाठी सडेतोड लिखाण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढारीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वर्धापनदिनाला मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून पुढारी परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या वेळी पुढारीच्या निर्भीड पत्रकारितेबद्दल समाधान व्यक्त करून विविध समस्या, प्रश्‍नांवर नि:पक्षपणे आवाज उठवल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

वर्धापन दिना सोहळ्यात सकाळी आ. राजन साळवी यांनी पुढारीकार ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित, बिपीन बंदरकर, सभापती शिल्पा सुर्वे, वैभवी खेडेकर, सभापती सुहेल मुकादम, नगरसेवक किशोर मोरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते आदी उपस्थित होते.