Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Konkan › जिल्ह्यात ५००० कि.मी.च्या रस्त्यांचे प्रस्ताव

जिल्ह्यात ५००० कि.मी.च्या रस्त्यांचे प्रस्ताव

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:10PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे पूर्ण झाली असून जिल्ह्यात पाच हजार आणि राज्यात 50 हजार  कि.मी.चे प्रस्ताव आणि आराखडे तयार करण्यात आले आहेत. ही कामे पुढीलवर्षी पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती  केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी   शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  मुंबई - गोवा  महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी डिसेबर अखेरीस टप्पा -1 चे काम पूणर्र् होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे खासदार निधी व सांसद  आदर्श ग्राम योजनांचा आढवा बैठक घेतली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जुंजारे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमा अंतर्गत 64 नळ पाणीपुरवठा योजनांच्या दूरूस्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या धोेरणात बदल करण्यात आला असून आता या योजनेसाठी राज्य आणि केंद्र शासनाचा समान हिस्सा राहणार असल्याने ही कामे पूणर्र् करण्यात येणार अल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री गीते यांनी या बैठकीत सांगितले.

या वेळी बोलताना श्री. गीते यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जी कामे प्रगतिपथावर आहेत अथवा जी कामे अद्याप सुरु केलेली नाहीत ती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. तसेच दिशा समिती आणि सांसद आदर्श ग्राम योजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.