Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Konkan › खासगी डॉक्टर आज संपावर

खासगी डॉक्टर आज संपावर

Published On: Jan 02 2018 1:09AM | Last Updated: Jan 01 2018 9:56PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्द्यावरून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डॉक्टर विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशारातील डॉक्टरांना मान्य नसल्याने डॉक्टरांच्या संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने 2 जानेवारीला देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  संपकर्ते डॉक्टर हा दिवस  ‘काळा दिवस’ म्हणून पाळणार आहेत.

या संपामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची रत्नागिरी शाखाही सहभागी होणार असून, मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 असे बारा तास हा संप होणार आहे. या कालावधीत खासगी 
रुग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. पराग पाथरे यांनी दिली. 

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्णांच्या विरोधात असून, याबाबत डॉक्टारांची संघटना सरकारसोबत वर्षभर चर्चा करीत आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही काही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढेल. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कोणाचाही वचक राहणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपात उतरणार आहे. सरकारने सहा आठवड्यांत मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे. दि. 2 जानेवारीला होणारा देशव्यापी संप सरकारविरोधातील या लढाईचे पहिले पाऊल असेल. यामध्ये ‘आयएमए’ने दि. 2  रोजी संप पुकारला आहे.