होमपेज › Konkan › पावस तीर्थक्षेत्री भक्तीचा महापूर

पावस तीर्थक्षेत्री भक्तीचा महापूर

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:33PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील पावस येथे स्वामी स्वरुपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून ‘ॐ राम कृष्ण हरी’ चा जयघोष करीत असंख्य दिंड्या पावसमध्ये आल्याने भक्तीचा आणि श्रद्धेचा महापूर आला आहे.

2 डिसेंबरपासून जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. गुरुवार 14 डिसेंबर या मुख्य दिवशी पहाटे तीन वाजता काकडा आरती, चार वाजता समृद्ध पूजा, सकाळी सहा वाजता आरती, नऊ वाजता अनंतनिवास ते समाधी मंदिरदरम्यान दिंडी, दहा वाजता आरतीनंतर महाप्रसाद, दुपारी 11 ते 2.30 पर्यंत सुधीर भातखंडे व श्रीकृष्ण गोडबोले यांचे अभंगगायन व कोल्हापुरातील उत्तरेश्‍वर भजनी मंडळाचे भजन झाले. दुपारी 3.30 वाजता वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण, सायंकाळी पाच वाजता अवधूतबुवा टाकळीकर यांचे जन्मोत्सव कीर्तन, रात्री 9.30वाजता अभंग गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमांसाठी मुंबई, पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.