Thu, Nov 15, 2018 07:26होमपेज › Konkan › कोकणात ४८ तासांत अवकाळी 

कोकणात ४८ तासांत अवकाळी 

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आगामी 48 तासांत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून मळभी वातावरण राहण्याचा अंदाज वेधशाळेने हवाई संंदेशाद्वारे वर्तविला आहे. 

अवकाळीने आतापर्यंत कोकणाचा परीघ व्यापला होता. आता त्याचा विस्तार अन्य भागांतही होण्याचे संकेत आहेत. हा पाऊस कोकणसह पुणे, मुंबई, विदर्भ आणि अन्य भागांतही होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार कोकणात दिवसभर मळभी वातावरणाचा स्तर कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीला अवकाळीच्या हलक्या सरी झाल्या होत्या. मे महिन्याच्या  पहिल्या आठवड्यातही रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्‍वर आदी भागांसह राजापूर आणि लांजा तालुक्यांतही पाऊस झाला.