Sun, Nov 18, 2018 20:30होमपेज › Konkan › देशाच्या अमृतमहोत्सवाचे नियोजन आताच करा

देशाच्या अमृतमहोत्सवाचे नियोजन आताच करा

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:40PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याला सन 2022 साली 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षाचे नियोजन आतापासूनच करा, असे प्रतिपादन भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.

येथे सुरू असलेल्या ‘अभाविप’च्या कोकण प्रदेश अधिवेशनात पूर्व कार्यकर्ता एकत्रीकरण कार्यक्रमासाठी ते रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सत्कार केला. या वेळी ‘अभाविप’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, मिलिंद मराठे, क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी, माजी जिल्हाप्रमुख संभाजी आंब्रे, राष्ट्रीय सहसंघटक जी. लक्ष्मण आदी उपस्थित होते.