होमपेज › Konkan › अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे; शिक्षकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे; शिक्षकावर गुन्हा दाखल

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरानजीकच्या एका नामांकित शाळेत सहावीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना बंद वर्गात नेऊन त्यांच्याशी अश्‍लील चाळे  केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो)  नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शामसुंदर कृष्णाजी गोठणकर (रा.कुवारबांव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलींपैकी एकीच्या आईने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शामसुंदर गोठणकर या शिक्षकाने सहावीत शिकणार्‍या या दोन मुलींना वर्गप्रमुख केले होते. त्यांच्याशी जवळीक करण्याच्या उद्देशाने त्याने त्यांना मोबाईलवर सेल्फी काढायची आहे, असे सांगत त्यांना बाजूच्या बंद वर्गात नेले होते. बंद वर्गात गेल्यावर गोठणकरने वर्गाचा दरवाजा बंद करून त्यांच्याशी अश्‍लील वर्तन केले. याप्रकरणी मुलींनी आपल्या घरी सर्व माहिती सांगितली होती. परंतु,  मुली घाबरलेल्या असल्यामुळे त्यांच्या पालकांनी तातडीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. याबाबत मंगळवारी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.