Fri, Jan 18, 2019 11:26होमपेज › Konkan › पळून जाऊन लग्न करण्यास मदत केल्याने तरुणावर वार

पळून जाऊन लग्न करण्यास मदत केल्याने तरुणावर वार

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मावस भावासह त्याच्या पत्नीने आपल्या बहिणीला पळून जाऊन लग्न करण्यास मदत केल्याच्या रागातून भावाच्या उजच्या हातावर सुरीने वार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेश   संजय  कदम (रा. रसाळवाडी शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दिनेश सखाराम सावंत (30, मूळ रा. जांभरुण सध्या रसाळवाडी शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जितेश आणि दिनेश हे नात्याने मावस भाऊ आहेत. बुधवार 21 फेब्रुवारी 2018 रोजी दिनेश सावंत कामावरुन दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांच्या मागोमाग जितेशही घरात घुसला. त्याने दिनेशला शिविगाळ करीत तू व तुझ्या बायकोने माझ्या बहिणीला पळून जाऊन लग्न करण्यास मदत केली, असे म्हणत खिशातून सुरी काढून दिनेशच्या उजव्या दंडावर वार केला. या तो जखमी झाला आहे. याबाबत शहर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल झोरे करत आहेत.