Tue, Mar 26, 2019 20:14होमपेज › Konkan › महावितरणची थकबाकी ७ कोटींवर

महावितरणची थकबाकी ७ कोटींवर

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडे महावितरणच्या 83 हजार 305 ग्राहकांची तब्बल 7 कोटी 75 लाख 91 हजार रुपयांची थकबाकी असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांचे थकबाकीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. थकबाकीदारांविरोधात महावितरणकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे.आर्थिक वर्ष संपण्यास काही कालावधी उरल्याने महावितरणने वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचे तीन विभाग आहेत.