Mon, May 27, 2019 01:10होमपेज › Konkan › आंबा संरक्षणाचा कृती आराखडा कागदावरच!

आंबा संरक्षणाचा कृती आराखडा कागदावरच!

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

प्रतिकूल वातावरणाचा सामना करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी विभागाने आंबा मोहर  आणि उत्पादन वाचविण्यासाठी कृती आराखडा तयार केला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली. हा कृती आराखडा आता शेवटच्या टप्प्यात अंमलबजावणीची हाकाटी  करून कृषी विभागाने वराती मागून घोडे दामटविले आहेत.

यंदाच्या हंगमात निर्यात करण्यात आलेली आंब्याची गुणवत्ता घसरली असल्याने परदेशी पाठविलेली निर्यातही अडचणी आली असून, स्थानिक बाजारपेठेतही फळाची गुणवत्ता  राखता न आल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये झालेले ओखी वादळ आणि बदलत्या वातावरणाचा फटका आंबा मोहराला बसू नये, यासाठी जिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आंबा पिकाच्या संरक्षणासाठी कार्यक्रम राबविण्यात आला होता.  बदलत्या वातावरणानुसार आंबा मोहर संरक्षणासाठी कृषी विभागाने कृती आराखडा तयार केला होता. 

कृषी उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्गदशर्र्नाखाली तातडीच्या उपाययोजना अंमलात आणण्यात येणार होत्या. याकरिता प्रत्येक गावात दोन ‘कृषिमित्र’ नेमण्यात आले होते. डिसेंबरच्या अखेरीस जिल्ह्यातील वातावरणात गारवा होता. त्याआधी झालेल्या ओखी वादळाने अनेक भागात आलेला मोहर गळून गेला. त्यामुळे  यंदाचा हंगाम उशिरा सुरू  झाला. 

गतवर्षी  डिसेंबर अखेरीस जिल्ह्यातील तापमान 11 ते 15अंश सेल्सिअसने खाली उतरले होते. वातावरणात कमालीचा गारवा असला तरी उन्हाचा मागमूस नसल्याने आंब्यावर तुडतुडा, फुलकीड आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याची प्रत्यक्ष बागायतीत अंमलबजावणी करण्यात आलीच नाही.