Fri, Jul 19, 2019 22:59होमपेज › Konkan › महिलेशी अश्‍लिल वर्तन करणार्‍या आरोपीला कारावास

महिलेशी अश्‍लिल वर्तन करणार्‍या आरोपीला कारावास

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 9:34PMरत्नागिरी : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी कोकणनगर पोलिस चौकित अर्ज देण्यासाठी आलेल्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन व शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. साजिद अकबर पावसकर (31, रा. निवखोल, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

ही घटना 7 जानेवारी 2016 रोजी कोकणनगर येथील पोलिस चौकीत घडली होती. याबाबत फिर्यादी पोलिस नाईक गिरीष सावंत चौकित कामावर असताना रिझवाना हबीब खान (रा. किर्तीनगर,रत्नागिरी ) या तेथे चौकशी अर्ज देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा आरोपी साजिद पावसकरने चौकीत येउन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते.

याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिस हेड काँस्टेबल एस.बी.जाधव तपास करत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला 12 जानेवारी 2016 रोजी अटक करुन न्यायालयात त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. गुरुवार 17 मे 2018 रोजी या खटल्याचा निकाल देताना सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे केलेला युक्‍तीवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी आरोपीला सहा महिन्याचा साधा कारावास आणि 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.