होमपेज › Konkan › उत्कृष्ट कामकाजात महावितरणचे कोकण परिमंडळ राज्यात द्वितीय

उत्कृष्ट कामकाजात महावितरणचे कोकण परिमंडळ राज्यात द्वितीय

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

 राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे राज्यातील सर्व परिमंडळांच्या कामकाजांचा आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍यांच्या यादीत  कोकण परिमंडळाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या क्षेत्रात सिंधुदुर्ग मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती प्र. मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी दिली.

उत्कृष्ट परिमंडळांना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात येते. यावर्षी भांडुप परिमंडळाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. वीजबिल वसुली, थकबाकीचे प्रमाण, ऑनलाईन पेमेंट, वीजगळती, वीजचोरी, वीज खंडित होण्याचे प्रमाण, भारनियमन, ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण या निकषांवर परिमंडळांच्या कार्यांची पाहणी केली जाते. 16 परिमंडळांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये कोकण परिमंडळाचे कार्य चांगले असल्याने या परिमंडळाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.