Tue, Sep 25, 2018 05:10होमपेज › Konkan › एम.आर. संघटनेचा एल्गार

एम.आर. संघटनेचा एल्गार

Published On: Dec 14 2017 1:45AM | Last Updated: Dec 13 2017 11:01PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

औषध विक्रीसंवर्धन कर्मचार्‍यांचे (एम.आर.) सर्वसाधारण कामाचे आठ तास करावेत, औषध कंपन्यांनी ‘एम.आर.’ना नियुक्तीपत्रे द्यावीत, किमान वेतनासह महागाई भत्ता मिळावा, बोनस, प्रॉव्हिडंड फंड आदींची अंमलबजावणी व्हावी, कामगारविरोधी कायद्यात बदल करावेत, या मागण्यासांठी मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या रत्नागिरी संघटनेतर्फे बुधवारी संप करण्यात आला. यानिमित्त शहरातून मोर्चा आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

औषध विक्री प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी एकदिवसीय संप करताना दिवसभर काम बंद आंदोलन केले. यानिमित्त शहरातून सकाळी दुचाकी रॅली आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील एम.आर. सहभागी झाले होते.