होमपेज › Konkan › रत्नागिरी : अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

Published On: Jun 02 2018 5:15PM | Last Updated: Jun 02 2018 5:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आज शनिवारी  दुपारी पावणे चार च्या सुमारास वाड्याच्या बाहेर उभ्या असणाऱ्या पंकज घवाळी या (२६ वर्षीय) तरुणावर वीज कोसळली. त्‍याला उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्‍याचा मृत्‍यू झाला.

या विषयी अधिक माहिती अशी, रत्‍नागिरीतील हातखंबा तारवेवाडी येथे वाड्‍याच्या बाहेर उभा असलेल्‍या पंकज घवाळी या युवकाच्या अंगावर वीज कोसळली. यानंतर तेथे उपस्‍थित असलेल्‍या एकाने त्‍याला तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल केले. मात्र वीजेचा धक्‍का इतका तीव्र होता की या युवकाची प्राण ज्‍योत मालवली. दरम्‍यान या वीजेच्या धक्‍क्‍याने आजूबाजुच्या घरातील वायरिंग देखील भस्‍मसात झाले आहे.