Tue, Dec 10, 2019 13:01होमपेज › Konkan › कोकण उद्ध्वस्त करण्याचा डाव 

कोकण उद्ध्वस्त करण्याचा डाव 

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 11:19PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

राजापूर रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत असल्याने आपल्याला धमकीचे पत्र आले असून त्याबाबत आपण अंधेरी ‘एमआयडीसी’ पोलिसांकडे तक्रार केली असल्याचे रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, दलालांच्या फायद्यासाठी अनेक नेतेमंडळी धडपडत आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाबाबत आवाज उठवणार आहे. ज्यादिवशी हा प्रश्‍न उपस्थित होणार आहे तेव्हा आंदोलक नागपुरात जाऊन उपोषण करणार आहेत.

तब्बल 30 हजार लोक या प्रकल्पाविरोधात असून आपणही शपथच घेतली आहे. ‘जगलो तर प्रकल्प हटवणार नाहीतर मरण पत्करु’, असे सांगून ‘30 हजार गोळ्या तयार ठेवा, जीव तरी घ्या किंवा प्रकल्प तरी हटवा’, असा इशाराही दिला. हा प्रकल्प कोकणात कुठेही नेला तरी लढतच राहणार असून वेळ पडल्यास पत्नीसह प्राणांतिक उपोषणही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.