Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Konkan › नोकरीच्या आमिषाने फसवणूक; नवी मुंबईतील मुख्य सूत्रधाराला अटक

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; नवी मुंबईतील मुख्य सूत्रधाराला अटक

Published On: Aug 07 2018 10:54PM | Last Updated: Aug 07 2018 10:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून काळबादेवीतील आठ जणांची सुमारे 7 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार संशयितांपैकी  मुंबईतील मुख्य सूत्रधाराला ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि. 6) अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत केली. यापूर्वी या गुन्ह्यातील तीन संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत.

 अमोल विठोबा तोडकरी (32, सध्या  रा. शिवाजी तलाव  घणसोली, नवी मुंबई, मूळ रा. काजिर्डा आर्डेवाडी, ता. राजापूर) असे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. यापूर्वी नरेश जनार्दन मयेकर, संगीता संभाजी जोशी, महेश बाबू जोशी (सर्व रा. काळबादेवी मयेकरवाडी, रत्नागिरी) या तिघांचा अटकपर्व जामीन अर्ज सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांच्याविरोधात उपेंद्र अनिल मालगुंडकर (31, रा. काळबादेवी मयेकरवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, या चौघांनी मिळून उपेंद्र मालगुंडकर यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अमोल तोडकरीच्या बँक खात्यात 75 हजार रुपये भरुन घेतले. तसेच या चौघांनी गावातीलच उमेश कनगुटकर, ऋषिकेश जोशी, दीपेश खवळे, अमर धातकर, प्रशांत पाटील, आशिष वेलवणकर आणि रेश्मा दरिदृर या सातजणांना 6 लाख 66 हजार रुपये तोडकरीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून सुमारे 7 लाख 41 हजार रुपये घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून आठ जणांची फसवणूक केली. 
तपासादरम्यान अमोल तोडकरी मुंबईत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळली होती. त्यानुसार, पोलिसांनी सोमवारी तोडकरीच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी त्याला हजर केेले असता न्यायालयाने त्याची रवानगी 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत केली.