Mon, Jan 21, 2019 23:22होमपेज › Konkan › कोकणात १० पर्यंत अतिवृष्टीची शक्यता

कोकणात १० पर्यंत अतिवृष्टीची शक्यता

Published On: Jul 07 2018 10:42PM | Last Updated: Jul 07 2018 10:17PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टी भागात रायगड, पालघरसह उत्तर रत्नागिरीत पावसाने जोरदार सक्रियता दाखविली असतानाच दक्षिण रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतली आहेे. जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड, मंडणगड तालुक्यांना पावसाने झोडपले असताना रत्नागिरीसह अन्य तालुक्यांत मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने  आगामी काही दिवस कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचे राहतील, असा इशारा दिला आहे. यामध्ये काही भागात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या नोंदीनुसार सकाळी साडेआठ वाजता जिल्ह्यात सरासरी 21. मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात 45 आणि खेडमध्ये  30 मि. मी. पाऊस झाला. मात्र, सकाळी सुरू झालेल्या पावसाने या भागात पूरस्थिती निर्माण केली तर अन्य तालुक्यांपैकी दापोली  13, गुहागर 7, चिपळूण 12, संगमेश्‍वर 14, रत्नागिरी 4, लांजा 22 आणि राजापूर 42 मि. मी. पावसाची नोंद झाली.