Sun, May 26, 2019 12:51होमपेज › Konkan › पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार

पतीकडून पत्नीवर धारदार शस्त्राने वार

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून संदीप यशवंत खानविलकर (रा. केदारवाडी, गणपतीपुळे) याने पत्नी स्वरा यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या प्रकरणी  जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

संदीप खानविलकरने शुक्रवारी रात्री पत्नी स्वराकडे पैसे मागितले. त्यावर पत्नीने आपल्याकडे पैसे नाहीत. जे होते ते तुम्हाला या आधीच व्यवसाय तसेच कर्ज फेडण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर संदीपने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता पहाटे  संदीपने झोपलेल्या पत्नीचे तोंड  दाबून धारदार शस्त्राने वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात स्वरा जखमी झाल्या आहेत.याबाबत अधिक तपास  सहायक पोलिस उपनिरीक्षक बनप करत आहेत.