Wed, Sep 26, 2018 14:05होमपेज › Konkan › आंबा-काजू हंगामाला ‘अवकाळी’चे ग्रहण!

आंबा-काजू हंगामाला ‘अवकाळी’चे ग्रहण!

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने  या समुद्राच्या परिक्षेत्रात असलेल्या प्रांतात निर्माण झालेल्या वादळी वार्‍याच्या परिणामाने कोकणासह अन्य काही भागांत अवकाळीची शक्यता  भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार बुधवारी जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर गुरुवारी दिवसभर मळभी वातावरण व संध्याकाळी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे ऐन काजू आणि आंबा हंगामात बागायतदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा- काजू हंगामाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. 

डिसेंबरमध्ये झालेल्या ओखी वादळामुळे आंबा हंगामाच्या प्रारंभीच  कोकणातील अनेक भागांत आंब्याचे नुकसान झाले होते. नुकत्याच सुरू झालेल्या आंबा हंगामात या वादळामुळे बागायतदार सावध झाले होते. त्यानंतरही  उत्तर महाराष्ट्रात बदललेल्या वातावरणामुळे गारपीटीचा परिणामही  वातावरणात झाला होता.