Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Konkan › जिल्ह्यात होणार दिव्यांगांचे ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण

जिल्ह्यात होणार दिव्यांगांचे ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 9:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या 844 ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी दिल्या आहेत. त्यासाठी ग्रामसभेत माहिती प्रसारित करून  या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

समाज कल्याण विभागाने प्रत्येक गावातील दिव्यांग व्यक्तींची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी गावागावांत गेले पाहिजे. तसेच प्रशासनाने यासाठी ग्रामसभा घेऊन दिव्यांगांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना ज्या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जात आहे, त्याच संस्थांना पुढील काळात प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. 

तसेच समाजाने दिव्यांगाना सर्वसामान्य माणसांप्रमाणेच सन्मानाची व आदराची वागणूक द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी केले आहे.दिव्यांगांसाठी 3 टक्के निधी खर्चाकरिता व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक विभागाने दिव्यांगांसाठी असलेला निधी वेळेत व त्यांच्यासाठीच खर्च करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने दिव्यांग कल्याण योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची सूचना केली.