Fri, Jul 19, 2019 07:48होमपेज › Konkan › गावखडीही ठरतेय कासव संवर्धनाचे गाव

गावखडीही ठरतेय कासव संवर्धनाचे गाव

Published On: Mar 14 2018 10:29PM | Last Updated: Mar 14 2018 10:21PMरत्नागिरी : योगेश हळदवणेकर 

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील वेळास या गावापाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील गावखडी हे गाव कासव संवर्धन करणारे गाव म्हणून नावारूपास येत आहे. बुधवारी वन विभाग आणि गावातील कासवमित्र यांच्या सहकार्याने गावखडी समुद्रकिनार्‍यावर 49 ऑलिव्ह रिडले जातीच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. त्यामुळे गतवर्षीपासून आतापर्यंत सुमारे 742 कासवांच्या पिल्लांना जीवदान देण्यात यश आले आहे.

गावखडी समुद्रकिनारी नोव्हेंबर ते फेबु्रवारी या काळात अनेक कासवे रात्रीच्यावेळी अंधारात अंडी घालण्यासाठी येत असतात. कासवमित्र व वन खात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्ती घालून कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम गावकर्‍यांमधील कासवमित्रांनी सुरू केले आणि ती अंडी समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळीमध्ये खड्डा काढून संरक्षित करण्यात आली. पुढील 50 दिवसांनंतर जन्माला येणार्‍या कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते. आतापर्यंत सुमारे 742 कासवांच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले आहे. रिसबुड यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाच्या पिल्लांना गावखडी समुद्रकिनार्‍यावर सोडण्यात आले तर 4 पिल्लांनी सकाळी लवकर समुद्राच्या दिशेने कूच केले.