Sat, Apr 20, 2019 10:09होमपेज › Konkan › गणपतीपुळे मंदिराची संरक्षक भिंत ढासळली

गणपतीपुळे मंदिराची संरक्षक भिंत ढासळली

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी

 समुद्री उधाणाच्या लाटांमुळे गणपतीपुळे येथील गणेश मंदिराची संरक्षक भिंत ढासळली आहे. या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यात वारेही वेगाने वाहत आहेत. यामुळे समुद्रानेही रौद्ररुप धारण केले असून, लांटाच्या जोरामुळे ठिकठिकाणी पडझड होत आहे. रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी, मिर्‍या, काळबादेवी येथील समुद्रकिनार्‍यांची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. 

तालुक्यातील गणपतीपुळे किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा फटका बसला आहे. येथील संरक्षक भिंतीला लाटा येऊन धडकत आहेत. गणेश मंदिराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंत फुटली असून, समुद्राचे पाणी मंदिराच्या पायथ्याला टेकत आहे. यामुळे येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.